एकतर्फी प्रेमातून शिक्षकाचा शिक्षिकेवर चाकू हल्ला

0

बोदवड :-तालुक्यातील नाडगाव कोल्हाडी रसत्यावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका शिक्षकाने महिला लिपिक पदावर कार्यरत असणार्या कर्मचारीवर चाकु हल्ला केल्याचि धक्कादायक घटना आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली. आयटीआय मधील ईलेक्ट्रिशियन ट्रेडचे शिक्षक कपुरचंद पाटिल यांनि क्लर्क पदावर कार्यरत असलेल्या चंदा घरकर यांच्यावर चाकुने वार करत स्वत:वर देखील वार केले आहेत.

नेमका प्रकार कशामुळे घडला हे अद्याप समजु शकले नाही. या प्रकारात दोन्हीही गंभिर जखमी झाले आहेत. जखमींवर पुढील ऊपचार जळगाव येथे होत आहे या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. _काही विद्यार्थी आयटीआय परिसरात ऊभे होते. त्यात महिला कर्मचारी त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी आल्या. त्यात शिक्षक पाटिल यांनि त्यांच्या कार्यालयात जाऊन दरवाजा बंद केला. व महिला कर्मचार्याचे केस पकडुन चाकुने वार केले. हा प्रकार काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला असता त्यांनि कार्यालयाकडे धाव घेतली त्यात दरवाजा बंद होता. विद्यार्थ्यांनि दरवाजा तोडत त्या शिक्षकाला आवरले. पन तेवढ्यात शिक्षक पाटिल यांनि महिला कर्मचारी चंदा घरकर यांच्यावर वार करुन स्वत:वर देखील वार केले._ संबंधित प्रकार विद्यार्थ्यांना विचारला असता त्यांनि या विषयावर बोलण्याचे टाळले प्रसंगी _प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी यांनिही मोबाईल फोन बंद ठेऊन संबंधित प्रकारावर मौन साधल्याचे दिसुन आले.

बोदवड आयटीआयला पुर्णवेळ प्राचार्य नसल्यामुळे  समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षक / कर्मचारी  वेळेवर येत नसल्याने प्रशिक्षण संस्थेच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह ऊपस्थित राहत आहे. सद्ध्या प्रवेश प्रकिया सुरु आहेत ग्रामीण भागातील मुलांचे नुकसान होऊ नये तसेच यापुढे संबंधित गैर प्रकाराला आळा बसायलाच पाहिजे यासाठी _शिवसेना नाडगाव , नांदगाव व कोल्हाडी यांच्या मागणीवरुन प्रशिक्षण संस्थेला शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांतभाऊ पाटिल_ हे भेट देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.