सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅकानी उपाय योजना कराव्यात – प्रताप इंगळे

0

जामनेर : – तालुक्यातील प्रत्येक बॅकेने आपल्या बॅंकेच्या दरवाज्याजवळ बंदुकधारी सुरक्षा रक्षक नेमून बॅंकेत सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे. बॅकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची व त्यांच्या सामानाची कसून तपासणी करावी.हेल्मेट घालून किंवा तोंडाला रुमाल बांधून कोणालाही बॅंकेच्या आत प्रवेश देऊ नये. बॅकेत किंवा आसपासच्या परिसरात कोणी संशयास्पद फिरत असल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. ग्राहकांना चांगली सेवा देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅक व्यवस्थापकांनी उपाय योजना कराव्यात असे प्रतिपादन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी काल दि.१९ रोजी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित बॅक व्यवस्थापकांच्या बैठकीत केले.

दि.१८ जून रोजी रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर भरदिवसा दुपारी दोन हेल्मेटधारी दरोडोखोरांनी दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला त्यात बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी यांना बंदुकीची गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून पोलीस प्रशासन व बॅक व्यवस्थापन जागे झाले आहेत.या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील,पोलीस नाईक सुनिल माळी,योगेश सोनवणे, अंकुश गोयल (अॅक्सिस),युसूफ अन्सारी (भारतीय स्टेट बॅक) विजय ढाके (युनियन),के.अनिल (सेन्ट्रल),सुनिल जाधव (येस), अनिल नलावडे (आयडीबीआय), सी.एन.शिवणे (जेडीसीसी), अमोल जबलपुरकर (एचडीएफसी)आदि बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.