उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

0

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुटीन चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली होती. पण अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. आता अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

 

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.