सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली.  गत वर्षाच्या तुलनेत सोने २५ टक्क्यांनी महागले. सोन्याच्या सतत होत असलेल्या चढ-उतारा मुळे ग्राहकांनी फक्त चौकशी करणे पसंत केले.

गेल्या वर्षी दसऱ्याला सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ३८ हजारांच्या आसपास होता. यंदा तो ऑगस्टमध्ये ५६२०० रुपयांवर गेला. तर रविवारी दसऱ्याला तो ५१ हजार अधिक जीएसटी इतका होता. त्यामुळे निम्म्याहून अधिक ग्राहकांनी सोने खरेदीचे बेत पुढे ढकलले.

दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा पसरल्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता  सोने, क्रूड आणि बेस मेटलचे दर आणखी घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

goodreturns या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५००५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१०५० रुपये आहे. त्यात १५० रुपयांची घसरण झाली. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४०० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२८९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०५१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१७१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२२० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१५१० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.