उद्याचा शुक्रवार तास १३ तास १३ मिनिटांचा

0

जळगाव :- जळगाव :- पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो.. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. दिवस १३ तास १३ तास १३ मिनिटांचा असतो. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो.

दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवत असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणूनही सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन सुध्दा अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण आपल्याला लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतू सुध्दा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळेच निर्माण होतात. २१ जून हा सर्वात माेठा दिवस अाहे. ताे १३ तास

आकाशात वैश्विक आणि आयनिक वृतांचे दोन काल्पनिक छेदन बिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूत २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो. (याला वसंत संपात बिंदू म्हणतात ) तर त्याच्याविरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो. (याला शरद संपात बिंदू म्हणतात) या दोन्ही दिवशी रात्रीचा आणि दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. इतर दिवशी मात्र दिनमान आणि रात्रमान हे कधीच सारखे नसते. २१ मार्चनंतर सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सूरू होतो. याला उत्तरायण असे म्हणतात. या वेळी जस-जसा सूर्य उत्तरेकडे सरकतो, तस-तसा दिवसाचा कालावधी वाढत जातो व रात्र कमी होऊ लागते. सूर्याचा हा उत्तरेकडचा प्रवास २१ जूनपर्यंत चालतो. या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो. अर्थात, म्हणूनच या दिवशी दिवसाचा कालावधी जास्त तर रात्र कमी कालावधीची असते.

दिवस व रात्रीचा बदल दरवर्षीच अापण अनुभवत असताे. सावलीत फरक दिसायला लागताे. तसेच दिवस अाणि रात्रीत लहान व माेठा फरक जाणवायला लागताे. त्या स्थितीवर अनेकांची कामे अवलंबून असतात. अाता २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असल्याने कुतुहूल निर्माण झाले अाहे.

सूर्यास्त ७ वाजून ११ मिनिटांनी 

सूर्याच्या या अती उत्तरेकडील बिंदूला विष्टंभ म्हणजेच समर सोल्स्टाइस असे म्हणतात. या बिंदूपाशी सूर्य थोडासा थकल्यासारखा भासतो व नंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो व येथून दिनमान कमी-कमी होऊ लागते व रात्रमान वाढत जाते. जळगावमध्ये २१ जून रोजी सूर्य सकाळी ५ वाजता ४७ मिनिटांनी उगवेल व सायंकाळी ७.११ मिनिटांनी मावळेल. म्हणजेच या दिवसाचा कालावधी १३ तास १३ तास १३ मिनिटांचा सेकंदाचा राहील.

२२ डिसेंबर लहान दिवस 

२२ सप्टेंबर रोजी सूर्य शरद संपात बिंदूपाशी पोहोचतो. त्या दिवशी दिनमान व रात्रमान सारखेच असते. २२ सप्टेंबरनंतर सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे सरकू लागतो आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो. आता मात्र दिनमान कमी होऊन रात्रमान वाढत जाते. २२ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाइस असे म्हणतात. या बिंदूत सूर्य असतानाचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते. या सर्वांमध्ये केवळ खगोलशास्त्राचे विज्ञान आहे. मात्र, जनतेत याबाबत अनभिज्ञता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.