मान्सून दोन-तीन दिवसांत कोकणात धडकणार

0

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती सध्या योग्य पद्धतीने सुरू असून, विविध अडथळ्यांचा सामना करीत ते तब्बल दोन आठवडय़ांच्या विलंबानंतर कोकणमार्गे राज्यात दाखल होणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे दक्षिण कोकण व्यापणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.

“वायू’ वादळ विरल्याने पुन्हा एकदा मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. सध्या मान्सून कर्नाटकाच्या दक्षिण भागापर्यंत पोहचला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्‍यक पोषक वातावरण निर्माण झाले असून अशीच प्रगती सुरू राहिली, तर येत्या दोन ते तीन दिवसांत तो कोकणात दाखल होईल.

दरम्यान, बुधवारी सकाळपासून राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. कोकणातील अनेक भागात  दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. घाट माथ्यावरही मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणारे ढग जमा होऊ लागले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात रिमझिम पावसाच्या सरी झाल्या. पुण्यातही बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी काही भागात सरी झाल्या. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.