ईव्हीएम व व्ही. व्ही.पॅटचे भडगाव तहसील मध्ये प्रात्याक्षिक

0

तहसिलदार सी.एम वाघ, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, पो. नि. धनंजय वेरुळे यांच्या उपस्थित टीमला हिरवा झेंडा

भडगाव दि. 28
ईव्हीएम व व्ही. व्ही.पॅट प्रशिक्षणासाठी भडगाव तहसील कार्यालय सज्ज आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय भारत निवडणूक आयोगाने र्एींशप व र्ीर्ींंरिीं ची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर र्शीां व र्ीर्ींंरिीीं चे प्रशिक्षण प्रसार ,प्रसिध्दी व जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यास अनुसरून मा जिल्हाधिकारी जळगाव श्री किशोर राजे निंबाळकर व पाचोरा भडगाव विभागाचे
विभागाचे प्रांत अधिकारी श्री राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार भडगाव यांनी जनजागृती व प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम व व्ही.व्ही.पॅट ची यादी मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्ष यांना दिली तसेच प्रशिक्षण व जनजागृती चे वेळापत्रक मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिली आहे
यासाठी आवश्यक सुविधा सह व्हॅन पुरविण्यात आली आहे त्यामध्ये नागरिकांना आव्हान करण्यासाठी लाउडस्पीकर ची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्हॅन सोबत र्शीां व र्ीर्ींंरिीं चे दोन सुसज्ज संच पुरविण्यात आलेले आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था भडगाव व्हे दोन प्रशिक्षित तज्ञ प्राध्यापक, दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , एक अव्वल कारकून एक कोतवाल व एक पोलीस कॉन्स्टेबल अशी टीम देण्यात आलेली आहे
दिनांक 28/12/2018 रोजी तहसील कार्यालय भडगाव येथे ईव्हीएम व व्ही.व्ही।पॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले तहसिलदार भडगाव श्री. सी.एम वाघ नगराध्यक्ष भडगाव श्री राजेंद्र पाटील पोलिस निरीक्षक भडगाव धनंजय वेरुळे होते व उपस्थित नागरिकांनी मतदान केले त्यानंतर नियोजित प्रोग्रामसाठी टीमला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.