खा. ए. टी. पाटील यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचा शुभारंभ

0

पाचोरा दि. 28
तालुक्यातील दत्तक गाव लोहटार सह अन्य गावात केंद्रीय व खासदार निधीतील विविध विकास कामांचे भूमीपूजन व शुभारंभ खा. ए. टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून लोहटार येथे आदर्श संसद, व पर्यटन विकास योजनांतर्गत 1 कोटी 39 लक्ष रुपये निधीतून रस्ते काँक्रीटीकरण, पोट गटारी, चतुर्भुज मंदिर परिसर सुशोभीकरण, केंद्रीय पेयजल योजनेतून 3 कोटी 4 लक्ष रुपये खर्चाची खडकदेवळा प्रकल्पातून लोहटार गावासाठी पाईपलाईन व जलशुद्धीकरण, तसेच खासदार फंडातून 10 लक्ष रुपये खर्चाची पेव्हरब्लॉक, 5 लक्ष गावांतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, व 1500 डसबिन वाटप. गिरणा नदीपात्रा वरील बांबरुड (महादेवाचे) येथे 90 लजश रुपये खर्चाचा साठवण बंधारा अश्या विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन व शुभारंभ करण्यात येणार आहे.
दि. 29 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता लोहटार येथे पार पडणार असुन सदर कार्यक्रमांना पक्ष पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, शहराध्यक्ष नंदु सोमवंशी, राज्य परिषद सदस्य डी. एम. पाटील, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.