ईकरातर्फे तालिमी कारवाच्या शैक्षणिक सुधारणा विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील इकरा शिक्षण संस्था जळगाव व ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “14 वा तालिमी कारवा तर्फे – शैक्षणिक सुधारणा” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न झाले.

पहिले सत्र इकरा कॅम्पस मोहाडी येथे संपन्न झाले. त्यात इकरा युनानी मेडीकॅल कालेज व इकरा कोविड सेंटर, इकरा बी. एड. कालेज, इकरा डी. एड. कालेज व इकरा पब्लिक स्कूल यांची दिल्ली येथील तालिमी कारवाच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली. सर्व पाहुण्यांनी इकरा शिक्षण संस्थेने केलेल्या कामांबद्दल गौरव उद्गार काढले व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

दुसरे सत्र “शैक्षणिक सुधारणा” या विषयावर इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात संपन्न झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा. मुजम्मिल काजी यांनी तिलावते कुराण-ए-पाक ने केला. त्यानंतर संस्थेचे गीत ‘तराना-ए-इकरा’ शहबाज अब्दुल रशीद सालार यांनी सादर केले.

कार्यक्रमात दिल्लीचे संपादक सय्यद मंसूर आगा, प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी, सुप्रीम कोर्टचे वकील एम. असलम अहेमद, प्रा. अख्तर अन्सारी, मोहम्मद इलियास, अलहाज अहेमद घौरी, महेर आगा, जकीया परवीन तसेच बीडचे मो. सफी अनवारी यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विषद केली. चर्चासत्राच्या द्वितीय सत्राचे अध्यक्ष प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी होते. या सत्रात असलम अहेमद, मोईन अख्तर अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी म्हटले कि, ‘आज विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण उद्देश पूर्ण असावे तसेच उद्देश पूर्ण झाले की नाही त्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा, पालकांचा, समाजाचा फीडबॅक घेण्यात यावा. नवीन शैक्षणिक धोरणाच्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा तसेच शिक्षण रोजगारक्षम असावे’ यावर त्यांचा भर होता. ईकरा संस्थेचे सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी आभार मानले. द्वितीय सत्रात शहरातील शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

तृतीय सत्राचे अध्यक्ष संपादक सय्यद मन्सूर आगा होते. ह्या सत्रात सफी अनवारी, असलम शेख, प्रा. कय्युम अन्सारी यांनीही मनोगत व्यक्त केले. ह्या सत्रात मुफ्ती हारून नदवी यांनी त्यांच्या शैलीत तराना-ए-इकरा सादर करून उपस्थितांचे मने जिंकून घेतली. आपल्या अध्यक्षीय भाषणात मंसूर आगा म्हटले कि, ‘आज समाजात, परिवारात संवाद बंद आहे. नैतिकता ढासळत आहे. आपण धर्माने सांगितलेल्या जीवन मूल्यांचे आचरण करीत नाही व धर्मातील केलेल्या बाह्य आडंबरास खरा धर्म मानत आहोत. प्रत्येक समाजाच्या अनुयांनी चारित्र्य जोपाल्यास एकमेंका विषयी असलेली घृणा कमी होण्यास मदत होईल’. सदर सत्रात अभियंता, डॉक्टर, नगरसेवक, वकील, समाजसेवक, उलमा आदि उपस्थित होते.

चौथे सत्र विशेषत: महिला, विद्यार्थिनी करीता ‘समाजाच्या शैक्षणिक विकासात महिलांचे योगदान’ विषयावर घेण्यात आले. ह्या सत्रात मेहर आगा, दिल्ली व जकीया परवीन, दिल्ली यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रात ईकराचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह, डॉ. ताहेर शेख, मजीद शेठ जकेरिया, अमीन बाद्लीवाला, प्रा. जफर शेख, माजी प्राचार्य रऊफ शेख, डॉ. अमानउल्ला शाह, नबी दादा बागवान, रशीद शेख, अब्दुल अजीज सालार, तारीख अन्वर, वहाब मलिक, जफर शेख पिंच, अश्फ़ाक़ बागबान, मुश्ताक सालार आदिची उपस्थिती होती. कार्यक्रमात अंजुमने तालीमुल मुस्लेमिन संस्थेचे अध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांच्या शैक्षणिक पत्रिके चे व  तारीख अन्वर लिखित ‘इंडिया इन टालेरन्स’ पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

पाचव्या सत्रात दिल्ली येथील तालिमी कारवा सोबत चर्चा करण्यात आली. त्यात सर्व प्रथम डॉ. अब्दुल करीम सालार यांनी इकरा शिक्षण संस्थेच्या विविध शाखांची मागील स्थापने पासून आज पर्यंतची कारकीर्द बद्दल चर्चा करून त्यांचे कौतुक केले. शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळून ते समाजात उत्कृष्ट कार्य करीत आहे. इकरा शिक्षण संस्थेत काम करणारे प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक यांनी नाविन्य पूर्ण केलेल्या कामा बाबत चर्चा करून व त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.