इन्फोसिस 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ !

0

नवी दिल्लीः आयटी सेक्टरमधली दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस लवकरच 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांना जास्त पगार आहे, त्यांच्यावर पहिल्यांदा ही कुऱ्हाड कोसळणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच कॉग्निझंटनं या कंपनीने १३ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यापाठोपाठ इन्फोसिसने देखील मोठी कपात करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांचा नोकरकपातीचा हा सिलसिला सुरूच आहे. कंपनी आपल्या जेएल 6 विभागामध्ये कार्यरत असलेल्या 2200 कर्मचाऱ्यां(10 टक्के)ना नोकरीवरून काढून टाकणार आहे.

इन्फोसिस कंपनीच्या जेएल 6 या विभागात सर्वाधिक भरमसाट पगार असलेले कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीमध्ये जेएल 6, जेएल 7 आणि जेएल 8 विभागामध्ये 3092 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी जेएल 3, जेएल 4 आणि जेएल 5 विभागातल्या देखील दोन ते पाच टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. अशा प्रकारे कंपनी जवळपास 4 हजार ते 10 हजारांपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. तसेच पुढील तीन महिण्यात कंपनी 12200 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यामध्ये 50 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सहाय्यक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्यकारी उपप्रमुख अशा पदांवरच्या जवळपास 50 जणांना नारळ देण्यात येणार आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीवरून लोकांना काढून टाकण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.