इंधन दर; ‘हा’ आहे आजचा भाव

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दर स्थिर ठेवले. मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

डब्ल्यूीआय क्रूड तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढले आणि ४०.२ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावले. चीनकडून मागणीत वाढ झाल्याने अमेरिकी तेल उत्पादन प्रक्रियांतील वाढ झाकोळली गेली. चीनने सप्टेंबर २०२० मध्ये ११.८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी आयात केली. कार्गोने सीमाशुल्क वसूल केल्यामुळे ही वृद्धी वार्षिक वृद्धी १.७५ टक्के एवढी झाली. डेल्टा चक्रीवादळामु‌ळे आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेतील मेक्सिकोतील खाडीतील ऊर्जा उत्पादनात मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे तेलातील लाभही मर्यादित राहिला.

Leave A Reply

Your email address will not be published.