सणासुदीच्या काळात धावणार ३९२ विशेष गाड्या , पाहा संपूर्ण लिस्ट…

0

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने ऑक्टोबर महिन्यातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 392 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या ट्रेनना फेस्टिव्हल स्पेशल असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेन २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात धावणार आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रेन कमीतकमी ताशी ५५ किलोमीटर गतीने धावतील. या ट्रेनचे भाडे देखील इतर विशेष ट्रेनच्या भाडयाइतकेच असेल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या ट्रेनमध्ये जास्तीतजास्त एसी-३ टीयर कोच लावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय रेल्वे शेवटी किती ट्रेन चालवणार आहे, असे सणासुदीच्या दिवस येण्याच्या कितीतरी दिवस आधीपासून चर्चा करण्यात येत आहे. भारतीय रेल्वे एकूण १०० ट्रेन सुरू करेल अशीही चर्चा ऐकायला मिळत होती, तर कोणी १५० ट्रेनचा अंदाज व्यक्त करत होते. मात्र, भारतीय रेल्वे सणासुदीच्या दिवसांमध्ये २०० ट्रेन चालवणार असून जर आवश्यकता पडली तर ही संख्या वाढवण्यात येईल असे रेल्वे बोर्डाच्या चेअरमननी स्पष्ट केले होते. आता रेल्वेने १९६ जोड्या ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. पाहूया या ३९२ विशेष ट्रेनची संपूर्ण यादी.

Leave A Reply

Your email address will not be published.