इंधन दरवाढीला ब्रेक ; जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलमध्ये सलग १२ दिवस झालेल्या दरवाढीने दोन्ही इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. दोन शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.दरम्यान, आज पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. काल रविवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले होते.

त्याआधी सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली.

आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोल ९७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.०६ रुपये आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८०.९७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.९८ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.५६ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.६१ रुपये असून डिझेल ८५.८४ रुपये झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.