इंटरनेट सुविधेसाठी खोदलेल्या चाऱ्या देतेय अपघाताला निमंत्रण

0

कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष ; यामुळे अपघात घडल्यास जबाबदार कोण?

लोहारा ता.पाचोरा :- तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेटच्या या नव्या युगात जोडण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे कंत्राट केंद्र सरकारच्या महा आयटी कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी सदर कंपनीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची व पंचायत समितीचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतल्याचे समजते हेच काम लोहारासह परिसरात तीन महिन्यांपासून सुरू असून बाकी काम झाले व उर्वरित काम अतिशय धिम्या गतीने होताना दिसून येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे येथील कन्या शाळेसमोर लोहारा ते पाचोरा रोडवर मार्गावरच खोदलेली चारी, लोहारा कासमपुरा रोडवर लेंडी नाल्याच्या वर व ग्रामपंचायतीच्या पाठीमागील परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील परिसर केबल जोडणीसाठी तीन महिन्यांपासून नाली खोदुन काही अंशीच काम बाकी असून अर्ध्यावरती काम सोडलेले आहे. पण या खोल चाऱ्यांमुळे मोठा अपघात होऊन नरबळी जाण्याची शक्यता आहे याकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते जिल्ह्यात रस्त्यांवर छोट्या छोट्या चुकीमुळे अपघात होताना दिसून येतात याचा बोध कंत्राटी कंपनीने घेऊन उर्वरित काम जलद गतीने करायला हवे चारीमुळे अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? अशावेळी कंत्राटी व्यवस्थापनात मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार होईल तरी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची वेळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.