इंटरनेट नसतांना करा डिजिटल पेमेंट; जाणून घ्या पध्दत

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजचे युग हे पूर्णतः डिजिटल झाले असून डिजीटल पेमेंट सगळीकडे वापरले जातात, मात्र यासाठी तुमच्य फोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असते. मात्र असे बऱ्याचदा होते की इंटरनेटच्या सुरु नसल्यामुळे UPI किंवा Wallet पेमेंट करता येत नाहीत.

आज आपण एक खास ट्रिक जाणून घेणार. ज्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसताना देखील Google Pay, Phone Pay, Paytm आणि Amazon Pay वापरुन डिजिटल पेमेंट करू शकाल. साधारण फीचर फोनवरून देखील डिजिटल पेमेंट करू शकता.

UPI, ऑनलाई मोड, इंटरनेट नसलेल्या फोनसाठी देखील ही सेवा उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत असे लोक देखील ऑनलाईन पेमेंट करु शकतात. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरकर्ते *99# डायल करावे लागेल, त्यावर USSD नावाची ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू केली होती. USSD आणि UPI आल्याने वापरकर्ते इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करू शकतात.

*99# डायल करून करा डिजिटल पेमेंट

1) इंटरनेटशिवाय डिजिटल पेमेंट करण्यासाठी, प्रथम सरकारचे BHIM अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यावर रिजीस्टर करावे लागेल. त्यावर UPI अकाउंट रजिस्टर करताना तुमच्या बँक खात्याशी जोडलेला फोन नंबर एंटर करा.

2) फोनवरून *99# डायल केल्यानंतर, तुमच्या फोनच्या स्क्रीनवर 7-पर्याय मेनू दिसतील. यामध्ये सेंड मनी, रिसीव्ह मनी, चेक बॅलन्स, माय प्रोफाइल, पेंडिंग रिक्वेस्ट, ट्रान्झॅक्शन आणि यूपीआय पिनचा पर्याय उपलब्ध आहे.

3) पैसे पाठवण्यासाठी ऑप्शन 1 ने रिप्लाय करा. हे केल्यानंतर तुम्ही UPI आयडी, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड आणि फोन नंबरच्या मदतीने ट्राजेक्शन पूर्ण करू शकता.

4) तुम्ही UPI पर्याय निवडला, तर तुम्हाला ज्या वापरकर्त्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा UPI आयडी टाकावा लागेल. तुम्ही बँक खाते निवडल्यास, तुम्हाला लाभार्थीचा बँक खाते क्रमांक आणि बँकेचा IFSC कोड टाकावा लागेल. जर तुम्ही तुम्ही फोन नंबर पर्याय निवडल्यास, तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर एंटर करावा लागेल. यानंतर, तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत तो नंबर टाकाला लागेल.

5) शेवटच्या टप्प्यात, तुम्हाला तुमचा UPI पिन टाकून सेंड ऑप्शन वा लागेल. व्यवहार पूर्ण झाल्यावर, व्यवहार पूर्ण झाल्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोन वर येईल या सेवेसाठी तुम्हाला 50 पैसे सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.