आ.खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? अजित पवार मुक्ताईनगरकडे रवाना

0

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे खडसेंचा पत्ता कापण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथराव खडसे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले असून त्यांना रा.कॉ.चे तिकीट देण्यासाठी त्यांचे मन वळवावे म्हणून माजी उपमुख्यमंत्री व रा.कॉ.चे नेते अजित पवार स्वत: मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहेत.  खडसे हे भाजपाचे वजनदार नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्गही समाजात आहे. खडसे पक्ष सोडणार वा नाही? हे सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.