आ. अँड आकाश फुंडकर यांच्याहस्ते कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ

0

खामगाव (प्रतिनिधी) :  आ. अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते कोविड 19 लसीकरनाचा शुभारंभ आज सकाळी 10 वाजता सामान्य रुग्णालय खामगाव येथे पार पडला.          संपूर्ण देशात आज जगातील सर्वात मोठ्या कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातही 13 लसीकरण केंद्रावर या कार्यक्रमाची सुरुवात झाली. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते लसीकरण मोहिमेस फीत कापून सुरवात करण्यात आली. त्यानंतर आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी लसीकरण विभागाची संपुर्ण माहिती घेऊन पाहणी केली. सर्वप्रथम सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे यांनी लस टोचून घेतली. त्यानंतर इतर कोरोना योद्धांचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात आज 200 कोरोना योद्धना कोरोना महारोगावर प्रभावी कोविशील्ड  लस देण्यात आली. इतर कोरोना योद्धना 18 जानेवारी ग्राम पंचायत निवडणूक मतमोजणी नंतर लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर दुसरी लस 28 दिवसानंतर देण्यात येणार असून याबाबत माहिती त्यांच्या मोबाईल  वर संदेशद्वारे मिळणार आले. आजच्या या कार्यक्रमात आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचेसह तहसीलदार शीतल रसाळ, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ एस बी वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ राजेंद्र सांगळे, रुग्ण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, राम मिश्रा, डॉ राहुल खंडारे, डॉ गुलाब पवार, डॉ राजाभाऊ क्षिरसागर, डॉ सुरेखा खर्चे, डॉ विलास चरखे, डॉ संजीत संत, डॉ ज्ञानेश्वर वायाळ, डॉ सुरेखा खडचे,डॉ दिनकर खिरोडकर,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अभिलाष खंडारे, श्रीमती सुमित्राताई राऊत, विठ्ठल पवार, गणेश देशमुख, रमेश अवचार, मुख्य औषध अधिकारी श्रीधर जाधव, शिवदास वाघमोडे, लसीकरण विभागाचे हर्षल गायकवाड, सुमन म्हात्रे, श्रीमती श्रद्धा मोहनकार, शुभांगी तायडे, श्रीमती मुक्ता ढोके,  पूजा सिस्टर, श्री जैन, श्री शेळके, भाजप चे विनोद टिकार, आशिष सुरेखा, उमेश (श्री) देशमुख, विक्की रेठेकर, आकाश बडासे, हितेश पदमगिरवर आदी कोरोना योध्यांची उपस्थिती होती.   —————————————- आ अँड आकाशदादा फुंडकर यांनी घेतली जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा    जिल्ह्यात बुलढाणा , खामगाव, शेगाव, मलकापूर, चिखली व देऊळगाव राजा या सहा ठिकाणी आजपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात कोरोना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर  योद्धना योद्धना मोफत कोविड 19 महारोगावरील प्रभावी लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात 19 हजार कोविशील्ड लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा आढावा आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांनीं जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांचेकडून घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.