आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आयसोलेशन सेंटर सुरु करा ; खा.उन्मेश पाटील यांची मागणी

0

कजगाव (प्रतिनिधी) -गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे सारे जग संकटात सापडले असुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील सर्व विभाग प्रयत्न करीत आहे.त्यांत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन दिवस-रात्र कार्य करीत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही भयावह असुन आजवर आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे मृत्यु पावले आहे.तसेच अनेक कोरोनाबाधीत झालेले आहे.त्याच बरोबर त्यांच्या परिवारातील सदस्यही मृत्यु पावले आहे.तसेच त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.कोरानाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे.अशा परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वंतत्र आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात यावे.तसेच 50 लाखाच्या विमा कवच सुरक्षा योजनेला मुदतवाढ देण्यात यावी.अशी मागणी जळगाव लोकसभा खा.उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्रकाव्दारे केली आहे.

याबाबतीत अधिक माहिती देतांना गोंडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कोरोना काळात कार्य करतांना आमचा कोरोना रुग्णांशी नेहमी निकटचा संपर्क येतो.अशा परिस्थितीत आमच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी अधिक प्रमाणात पाँझीटीव्ह येत आहे.फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करुनही आमच्यासाठी कुठेही राखीव बेड नाही.त्यामुळे आम्हांला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबतीत भडगाव व चाळीसगाव आरोग्य विभागाच्या वतीने 31 मार्च 2021 रोजी खा.उन्मेश पाटील यांना व्हाँट्सअप वर निवेदन देऊन मी स्वतः फोनवरुन आमची समस्या सांगितली होती.तसेच  9 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना,जळगाव यांच्यावतीनेही खा.उन्मेश पाटील यांना निवेदन दिले होते.ह्याचा पाठपुरावा करत खा.उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रकाव्दारे मागणी केली आहे.त्यांच्या ह्या मागणीमुळे आरोग्य विभागाने त्यांचे आभार मानले आहे.तसेच ह्या विषयावर लवकर खा.उन्मेश पाटील हे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रश्न निकाली लावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.