हातगाव अंधारी रस्त्यावर असलेल्या बोगस डॉक्टरवर कारवाई

0

चाळीसगाव प्रतिनिधी – कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना तालुक्यातील हातगाव, अंधारी रस्त्यावर शेतात अवैधरित्या वैद्यकीय दवाखाना थाटून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बंगाली डॉक्टर वर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला असून डॉक्टर मात्र फरार झाला आहे तालुकाभरात अशाच प्रकारे बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घातला असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे यांना तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी याने हातगाव अंधारी रस्त्यावर शेतात एक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती दिल्यावर दि 19 एप्रिल रोजी त्यांनी सकाळी 10-20 वाजता छापा मारला असता 2 रुग्णांना सलाइन लावून इतर रूग्ण दवाखान्यात उपस्थित होते बोगस डॉक्टर बंगाली यांना डिग्री व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल चे प्रमाणपत्र मागितले असता त्याने दिले नाही व तेथून पळ काढला, वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही परवाना नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टर बंगाली याचे विरोधात  डॉ लांडे यांनी फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भा द वी कलम 419, 420, महाराष्ट्र वैद्यक व्यावसायि अधिनियम 1961 चे कलम 33, 34, 36, 38 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार भालचंद्र पाटील करीत आहेत.

दरम्यान तालुकाभरात अनेक बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होवू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.