आरक्षणाबाबत मराठा क्रांती माेर्चातर्फे प्रशासनाला निवेदन

0

जळगाव | प्रतिनिधी
येथील राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे समाजातील २५० तरुण तरुणींचे वैद्यकीय प्रवेश रद्द झाले अाहेत. त्यांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी मराठा क्रांती माेर्चाच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांपर्यंत पाेहचवण्यासाठी जिल्हाधिकारी यांना देण्यात अाले.
मराठा समाजाने कायदेशीर आणि  घटनात्मक निकष लावून अारक्षण मिळवले असताना अापण केलेल्या दुर्लक्षामुळे आज तरुण राज्यातील सुमारे २५० तरुण तरुणींना राज्यात किंवा देशात काेठेही शैक्षणिक संधी मिळणार नसून राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराची ही तरुणाई बळी पडली आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून न्याय द्यावा. या निवेदनावर माेर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदू पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. सचिन चव्हाण, प्रमाेद पाटील, याेगेश पाटील, देवेंद्र मराठे, अजित पाटील, कृष्णा पाटील, प्रतिभा शिंदे, किरण पाटील, अॅड. विजय पाटील, राजेश पाटील, दीपक पाटील, सागर पाटील, संजय पवार, हेमंतकुमार सांळुखे अादींच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.