आयएएस परिक्षेत १२४ व्या आलेल्या प्रांजल पाटील यांचा सेनेतर्फे सत्कार

0

खचून न जाता जिद्द कायम ठेवली -प्रांजल पाटील

पाचोरा – कल्याणेहोळ ता.एरंडोल येथील इयत्ता तिसरीतच असतांना दोन्ही डोळ्याने दृष्टीहीन झालेल्या सौ. प्रांजल कोमलसिंह पाटील यांनी यु. पी. एस. सी. परिक्षेत भारतात १२४ वा तर महाराष्ट्रातुन  अकराव्या रॅंकने यश संपादन केल्याने त्यांचा पाचोरा येथे शिवसेना आणि राजे गृपतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार आर. ओ. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, चंद्रकांत चौधरी, मुकूंद बिल्दिकर, रामचंद्र पाटील (वराडसीम) डॉ. बाळकृष्ण पाटील, भरत पाटील (बोदवड) समाधान ढोले, प्रा.व्ही आर पाटील, एच. के. पाटील, यदुर्वेद महाजन, अॅड. विक्रांत पाटील,पप्पू राजपूत, प्रा. आर. एन. पाटील, वैभव कुलकर्णी,(उल्हासनगर)  कोमलसिंह पाटील, नरसिंह पाटील (आजोबा), एल. बी. पाटील (वडील), ज्योती पाटील (आई) गणशिंग पाटील, शरद पाटील सह अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पाचोरा येथील भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स येथे झालेल्या प्रांजल कोमलसिंह पाटील यांच्या सत्काराचे कार्यक्रमाप्रसंगी प्रास्थाविक भाषणातून  प्रांजल पाटील याचे विषयी माहिती देतांना ए. आर. राजपूत यांनी सांगितले की, प्रांजल ही इयत्ता तिसरीत असताना उन्हाळ्यात नातेवाईकांचे विवाहातून परत आल्यानंतर अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. या अचानक ओढवलेल्या प्रसंगानंतरही त्यांनी खचुन न जाता जिद्द कायम ठेवत प्रथम ठाणे येथील अंध शाळेत प्रवेश घेवून दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिला क्रमांक पटकाविला. नंतर दादर येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय घेवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर दिल्ली येथील जवाहर नेहरू विद्यापीठात एम. ए. एम. फिल. ची पदवी घेवून २०१६ मधे यु. पी. एस. सी. परिक्षेत भारतात ७७३ व्या क्रंमाकांने त्या उत्तीर्ण झालेल्या. एवढ्यावर समाधान न मानता २०१७ मधे यु.पी.एस.सी. परिक्षेत भारतात त्यांनी १२४ वा तर  राज्यात ११ वा  क्रमांक मिळविला. आणि डोळस असणाऱ्या तरुण-तरुणीं समोर एक आदर्श ठेवणारे यशस्वी कार्य करून दाखविले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, आमदार किशोर पाटील,माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी आमदार आर. ओ. पाटील यजूर्वेद महाजन यांनी सौ. प्रांजली कोमलसिंग पाटील यांच्या कठोर जिद्द व मेहनतीचे कौतुक केले. व त्यांच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

———-जिद्द व चिकाटी अंगीकारल्यास यश नक्कीच – प्रांजल पाटील——-
जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान कामी येत नाही. जिद्द व चिकाटी अंगीकारल्यास यश नक्कीच मिळेल. त्यासोबतच आपल्या आजू – बाजू ला होत असलेल्या घडामोडींचे आकलन करून प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्या. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची व देशात सामाजिक सुधारणा करण्याची काळाची गरज झाली आहे. स्वत:त कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास नक्कीच यश तुमच्या डोळ्यासमोर असेल आई – वडिलांनी मुलांवर आपले मत न लाधता त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडून द्या. माझ्या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील आजोबा आणि माझ्या पतीच्या मला लाभलेले सहकार्य व माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे मी आज येथे आय. ए. एस. अधिकारी यश संपादन करू शकले.

Leave A Reply

Your email address will not be published.