पाचोरा विभागातील पोलिस पाटील भरती प्रक्रियेच्या तारखांमध्ये फेर बदल

0

अनेक गावातील अर्ज प्राप्त न झाल्याने मुदत वाढ , ५० ऐवजी ५४ गावात होणार भरती प्रक्रिया
पाचोरा;- – पाचोरा विभागातील पाचोरा व भडगांव तालुक्यात ५४ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने या भरतीसाठी आर्हताधारक उमेदवारांनकडुन विहीत नमुन्यात आॅनलाईन पध्दतीने www.jalgaonexam.com या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. आॅनलाईन पध्दतीने १७ मे २०१८ पर्यंत अर्ज करण्याची अंतिम कळविण्यात आली होती. परंतु बहुतांशी गावातील अर्ज प्राप्त झालेले नसल्याने आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवुन ती आता २५ मे २०१८ व चलन भरण्याची अंतिम तारीख ३० मे करण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षेची तारिख २७ मे २०१८ अशी कळविण्यात आली होती. तीही तारीख पुढे ढकलण्यात येत असुन परिक्षेची तारिख लवकरच कळविण्यात येणार आहे. तरी गावनिहाय इच्छुक उमेदवारांनी आॅनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी केले आहे.

गावनिहाय पोलिस पाटलांची रिक्त पदे पुढीलप्रमाणे –
पाचोरा तालुक्यातील लोहारी खु”, जामने, संगमेश्वर, गोराळखेडा खु” (इतर मागासवर्गीय महिला राखीव), भडाळी (विशेष मागास प्रवर्ग महिला), कळमसरा, शिंदाळ, सातगांव (डोंगरी), डोकलखेडा, तारखेडा खु”, वडगांव खु”, परत.भ., विष्णुनगर, वडगांव जोगे, लाख तांडा (सर्वसाधारण महिला), राजुरी बु” (सर्वसाधारण), हनुमानवाडी, निंभोरी बु”, मोहाडी (भटक्या जमाती ड), मोहलाई (भटक्या जमाती ड महिला राखीव), बहुळेश्वर (भटक्या जमाती ब महिला राखीव), पिंप्री बु”, प्र.पा. (भटक्या जमाती ब), चुंचाळे, (अनुसूचित जमाती महिला राखीव), तारखेडा बु”, सारोळा खु” (अनुसूचित जाती), वाणेगांव, पिंप्री बु” प्र.भ. (अनुसूचित जाती महिला राखीव), साजगांव (अनुसूचित जाती), गव्हले (अनुसूचित जमाती), सांगवी प्र.भ. (अनुसूचित जमाती महिला राखीव), परधाडे, वडगांव खु”, प्र.पा., हडसन (अनुसूचित जमाती महिला राखीव), सार्वे बु” प्र.भ., बिल्दी बु” व निपाणे (अनुसूचित जमाती) वाढीव ४ गावे- अटलगव्हान, बदरखे, रामेश्वर तांडा व पुनगांव (खुला – सर्वसाधारण प्रवर्ग) तर भडगांव तालुक्यात लोण पिराचे (इतर मागासवर्गीय महिला राखीव), पळासखेडे (विशेष मागास प्रवर्ग), आमडदे, वडगांव नालबंदी, कराब (सर्वसाधारण महिला), आडळसे (भटक्या जमाती क महिला राखीव), तळबंद तांडा (विमुक्त जमाती अ महिला राखीव), वडजी (अनुसूचित जाती), पेंडगांव (अनुसूचित जाती महिला राखीव), उमरखेड (अनुसूचित जमाती, नावरे (अनुसूचित जमाती), लोण प्र.उ. (अनुसूचित जमाती महिला राखीव), व वलवाडी खु” (अनुसूचित जमाती) याप्रमाणे पोलिस पाटलांच्या ५४ जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.