आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव :   राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. विभागीय व जिल्हास्तरावर, तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या नविन व जुने विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी  www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, जि जळगाव अंतर्गत एकुण 17 आदिवासी मुला/ मुलींचे शासकीय वसतीगृह  कार्यरत आहेत या सर्व वसतीगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2020-21 करीता प्रवशे अर्ज www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहे.

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ( नविन व जुने) महाविद्यालय प्रवेशाच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, नविन व जुन्या विद्यार्थ्यानी अर्ज भरण्यापुर्वी संकेतस्थळावर दिलेल्या user manual  चे वाचन करुन त्या आधारे अचुक अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता प्रथम नोदणी (registration) करावे. नावनोदणी नंतर प्राप्त user id व passward  चा उपयोग करुन अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी नविन विद्यार्थ्यानी  Hostel Addmission मधील New Addmission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडावा. जे विद्यार्थी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात (जूने विद्यार्थी) प्रवेशित होते, अशा विद्यार्थीनी चालू शैक्षणिक वर्षात देखील अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता  Hostel Addmission  यामध्ये  Renew Hostel Addmission  हा पर्याय काळजीपूर्वक निवडून पुढील अर्ज भरावा.

 

जुन्या विद्यार्थ्यांनी युझर आयडी व पासवर्ड मिळणेसाठी www.swayam.mahaonline.gov.in  या वेबसाईडच्या होमपेजवर forgot password  चा वापर करावा यामध्ये आवश्यक ती माहिती भरुन पासवर्ड रिसेट करुन घ्यावा. वसतीगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याने प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. वसतीगृहासाठी अर्ज करतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे ( उदा. मागील वर्षी मिळालेले गुण/ गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहित, टी.सी. चालू वर्षी प्रवेश घेतलेल्या शाळा/ महाविद्यालयाचे बोनाफाईड/प्रवेश पावती, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बॅकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, वैद्यकीय दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे) विद्यार्थ्यानी सोबत बाळगावीत.

 

सन 2020 -21 आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक इयत्ता/ अभ्यासक्रम – pre-Matric  इयत्ता 8 वी ते 10 वी- अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक -12 जानेवारी, 2021 आहे. नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे– 15 जानेवारी, 2021, निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी – 18 जानेवारी, 2021 ते 22 जानेवारी 2021

 

इयत्ता 11 वी व 12 वी – 12 जानेवारी, 2021 – नविन विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करणे – 15 जानेवारी, 2021 – निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा कालावधी – 18 जानेवारी, 2021 ते 22 जानेवारी 2021 पर्यंत राहील.

 

वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल यांना राहतील. असे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.