गलंगी ग्रामपंचायत झाली विस वर्षांनंतर पहिल्यांदा बिनविरोध

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)- अनेर परिसरातील गलंगी गावात विस वर्षांत पहिल्यांदा रंगराव सिताराम देवराज सेवानिवृत्त उपयुक्त विक्री कर विभाग व छगन सिताराम देवराज सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक यांच्या मनमिळाऊ स्वभावाने गावातील बिनविरोध निवडणूक करून चोपडा तालुक्यातील मान मिळविला आहे.

यात सध्याच्या परिस्थितीत रंगराव देवराज यांना एकमुखाने सरपंच पदी घोषित करण्यात आले पण शासनाने आरक्षण राखवून घेतल्याने गावातील ग्रामस्थांच्या नजरा फक्त आता आरक्षणाविषयी लागून आहेत यात ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून विश्वास जानकिराम रायसिंग सेवा निवृत्त पोलीस राहूल देवराज,गोपाल यशवंत देवराज,शुशिला बाई बाविस्कर,सुंदर बाई देवराज,सितल देवराज,मंदाबाई भिल्ल,उज्जवला भिल्ल यांचा समावेश आहे गलंगी ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्याने नियुक्त सदस्याचे व फार्म माघारी घेतलेल्या उमेदवार यांचे गलंगी ग्रामस्थांनी फूलहार देऊन गावात स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.