आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 1000 रुपयांनी स्वस्त ; जाणून घ्या नवे दर

0

नवी दिल्लीः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळाली. आज सोने 81 रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी 984 रुपयांनी स्वस्त झाली. दिल्ली सराफा मार्केटमध्ये 81 रुपयांच्या घसरणीसह सोन्याचा भाव 10 ग्रॅम 46,976 रुपयांवर बंद झाला. रुपयाच्या वाढीमुळे सोन्या-चांदीच्या किमती (Gold Silver Price) खाली आल्यात. मागील व्यापार सत्रात सोन्याचा दर दहा ग्रॅम 47,057 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.

चांदी आज 984 रुपयांनी घसरून 67,987 रुपये प्रतिकिलो झाली. मागील व्यापार सत्रात ती प्रति किलो 68,971 रुपये होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी रुपया 24 पैशांच्या वाढीसह 74.77 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात किंचित वाढ झाली. दुपारी 3.45 वाजता सोन्याचा भाव प्रति औंस 1780 च्या पातळीवर होता. यावेळी चांदीची किंमत प्रति औंस 26.13 डॉलरच्या पातळीवर होती.

यावेळी डिलिव्हरी सोन्यातही घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सायंकाळी 4.25 वाजता जून डिलिव्हरीचे सोने 45 रुपयांनी घसरून 47487 रुपयांवर आणि ऑगस्टच्या सुवर्ण सोन्याचे भाव 8 रुपयांनी घसरून 47825 रुपयांवर बंद झाले. यावेळी मे डिलीव्हरीसाठी चांदी 60 रुपयांनी घसरून 68614 आणि जुलै डिलिव्हरी चांदी 110 रुपयांनी घसरून 69724 वर बंद झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.