आजपासून बोदवड शहर सलग तिन दिवस बंद

0

बोदवड (प्रतिनिधी) :- शहरात कोरोना विषाणूचा झालेला शिरकाव पाहता कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचे अहवाल जो पर्यंत प्रशासनाला प्राप्त होत नाही,तोपर्यंत संपूर्ण तालुक्यासाठी हि धोक्याची घंटा आहे.

या पार्श्वभूमिवर तसेचं कोरोना विषाणूची साखळी तुटावी याकरिता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटिल यांच्याकडून बोदवड शहर बंदचे सलग तिनदिवसीय आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसिलदार हेमंत पाटिल साहेब यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तरी,आज दिनांक १०,११ व १२ असे हे तिन दिवस बोदवड शहर बंद राहणार आहे.यांत मेडिकल,दवाखाने,कृषी केंद्र व दूध डेअरी वगळता बाकी सर्व आस्थापना बंद राहणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.