राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्ष पदी संदीप हिवाळे

0

जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील कस्तुरी नगर येथील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारे व तालुक्यात सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे संदीप मधुकर हिवाळे यांची जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद बी. मानकरी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच संदीप हिवाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचविण्याचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्या महापुरुषांच्या विचाराचे संघटन बांधणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. नियुक्ती पत्र प्रधान करतेवेळी जामनेर तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.