आचार्य महोत्सवाच्या निमित्ताने शेंदुर्णीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

विधानसभेचे भुतपुर्व उपसभापती शिक्षण महर्षी आचार्य बापुसाहेब गजाननराव गरुड यांच्या ३७ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आचार्य महोत्सव २०२१ मध्ये शेंदुर्णीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १६ डिसेंबर,आचार्य महोत्सव २०२१ चे उद्घाटन दि. १७ डिसें रोजी अ. र. भा. गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या आऊट डोअर स्टेडीयम येथे सकाळी ११ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून क्रिडा युवक सेवा विभागाचे उपसंचालक – शेखर पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

यात मैदानी क्रीडा महोत्सव दि. १७ डिसेंबर २०२१ (शुक्रवार) ते दि. १९ डिसेंबर २०२१ ठिकाण :- अप्पासो.र.भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी (आऊटडोअर स्टेडीयम ) क्रीडा खेळाडुंचे संचलन- सकाळी ११.०० वाजता नगरपंचायत प्रांगण, शेंदुर्णी पासुन ते अ.र.भा.गरुड कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आऊटडोअर स्टेडीयम (क्रीडांगणपर्यंत) स्पर्धेचे उद्घाटन – ठिक दुपारी ०१.०० वाजता होणार असून उद्घाटक शेखर पाटील उपसंचालक-क्रीडा युवक सेवा विभाग, नागपुर हे आहेत.

डॉ. दिनेश पाटील क्रीडा संचालक क.ब.चौ. उमवि राजेश जाधव (सचिव, जिल्हा अॅथेलॅटीक्स संघटना जळगांव) अरुण धनवडे, पोलिस निरीक्षक-पहूर पो.स्टे.श्री. संजय भा. गरुड ( चेअरमन-धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु.सोसा.), सतिष चंद्र काशिद (सचिव-धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु.सोसा ), सागरमलजी जैन ( संचालक-धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु.सोसा.), मिलींद दिक्षीत जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव,

अरुण शेवाळे तहसिलदार जामनेर यांची उपस्थिती लाभणार आहे.

आचार्य महोत्सवा प्रित्यर्थ रुग्णांना फळे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय भा. गरुड (चेअरमन-धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु. को. ऑप. सोसा. लि.) आ.श्री.किशोरजी दराडे सदस्य-विधान परिषद महा. राज्य, मुंबई (सतीष चंद्र काशिद सचिव-धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु. को. ऑप. सोसा. लि.शेंदुर्णी ता. जामनेर) जि. जळगांव अध्यक्ष *मुख्याधिकारी नगरपंचायत, शेंदुर्णी साजीद पिंजारी चेअरमन- मौलाना आझाद ग्रा.बि.शेती पतसंस्था कुतुबुद्दीन काझी डॉ. सागर गरुड (संचालक विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,पाचोरा) उत्तमराव थोरात (तज्ञ संचालक राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्था)

उद्घाटक अध्यक्ष वार-सोमवार स. ८ वाजता दि. २० डिसेंबर २०२१प्रमुख अतिथी पारितोषिक वितरण सोहळा शुभहस्ते डॉ. श्री. बी. बी. चव्हाण श्री. संभाजी पाटील मा. चेअरमन-जळगांव जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लि. प्राथमिक आरोग्य केंद्र, शेंदुर्णी भव्य रक्तदान शिबीर व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दि. २० डिसेंबर २०२१ वार-सोमवार स. ९ वाजता -ठिकाण-आचार्य गजाननराव गरुड प्राथ. विद्यामंदीर, शेंदुर्णी येथे होणार आहे. डॉ. श्री. एन. एस. चव्हाण जिल्हा शल्यचिकीत्सक, जळगांव मा. श्री. सतीष चंद्र काशिद सचिव धी. शेंदुर्णी सेकं .एज्यु.को.ऑप.. सौ. उज्वलाताई स. काशिद (संचालिका- धी. शेंदुर्णी सेकं. एज्यु. को. ऑप सोसा.), सौ. विजयाताई खलसे (नगराध्यक्ष नगरपंचायत शेंदुर्णी), सौ. चंदाबाई अग्रवाल (उपनगराध्यक्षा नगरपंचायत, शेंदुर्णी) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा, निबंध स्पर्धा पारितोषिक समारंभ दि. २० डिसेंबर २०२१ वार-सोमवार स. १०.३० वाजता -ठिकाण-आचार्य गजाननराव गरुड माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, येथे होणार असून

उद्घाटक आ. सुधीरजी तांबे (सदस्य-विधान परिषद महाराज्य, मुंबई), सौ. उज्वलाताई स. काशिद (संचालिका- धी शेंदुर्णी सेंक . एज्यु. को ऑफ . सोसा.) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

किर्तन व संगीत रजनी चे आयोजन दि. २० डिसेंबर २०२१ ठिकाण नगरपंचायत प्रांगण, शेंदुर्णी येथे करण्यात आलेले आहे. संगीत रजनीसाठी – मा. श्री. गोविंदराव मोकाशी (गायन), मा.सौ. उर्मिला शिवपुजे (गायन) मा.श्री.पांडुरंग पाटील (तबला) यांची उपस्थिती लाभणार आहे.

वार-सोमवार, रात्री ८ वाजता किर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे . किर्तनकार मा. श्री. पोपट महाराज, कासारखेडेकर भजनी मंडळ- शेंदुणी, सोयगांव, चिलगांव, पाळधी, सोनाळा आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला वर्ष – १३ चे आयोजन दि. २१ डिसेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ वेळ- रात्री ८ वाजता ठिकाण नगरपंचायत प्रांगण,शेंदुर्णी ता. जामनेर जि. जळगांव येथे करण्यात आलेले आहे.

अॅड. प्रकाश पाठक (C.A.) धुळे(जेष्ठ विचारवंत व साहित्यीक वक्ते), डॉ. भावेश भाटिया (महाबळेश्वर), उद्योजक (दिव्यांग १५० पॅराऑलम्पिक अवार्ड विजेते), महेश अंचितलवार मान्यवर वक्ते व्याख्यान मालेसाठी निमंत्रित करण्यात आलेले आहेत. व्याख्यानासाठी उद्बोधनपर विषय ‘मुके झाली घरे , रुक जाना नही, सुख ऑनलाईन आहे.

वरीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन असुन सदर कार्यक्रमास आपण आप्त व ईष्ट मित्रांसह उपस्थित राहुन आयोजकांचा आनंद व्दिगुणीत करावा. असे अवाहन संजय भा. गरुड (अध्यक्ष), सतिष चंद्र काशिद ( सचिव) दिपक का. गरुड (सहसचिव धी, शेंदुर्णी सेकंडरी एज्यु.को.ऑप. सोसा.लि. शेंदुर्णी ता.जामनेर जि. जळगांव), सौ. उज्वला स. काशिद (संचालिका), कैलास व. देशमुख (वसती गृह सचिव) व कर्मचारी वृंद धी शेंदुर्णी सेकं . एज्यू . सोसा . शेंदुर्णी च्या वतीने करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.