आईस्क्रीमच्या आर्डरवरून तुफान हाणामारी; परस्परांवर गुन्हे दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील नुतन मराठा महाविद्यालया जवळ असलेलले एक आईस्क्रीम पार्लर दुकानदार व सेल्समन यांच्या शाब्दिक वाद होवुन एकमेकांना मारहाण व नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शहरातील रायसोनीनगर येथे रहिवासी असलेले उमेश शांतीलाल कुमावत (वय ३७) हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वादाला सुरवात झाली.

या वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दरम्यान दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन जळगाव शहर पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.