संतापजनक.. १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरूण अटकेत

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

चोपडा येथील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणाला अटक करण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ती आठवीचे शिक्षण घेत आहे. गुरूवार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना गावातील संशयित आरोपी धीरज रविंद्र फुगारे (वय १८) हा घरात आला. मला फोन का लावत नाही असे म्हणून पहिल्यांदा मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान अडावद पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.