अ.भा.ग्रा.पत्रकार संघ भडगावतर्फे गिरणा परिसर नवरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात

0

कजगाव ता.भडगांव(वार्ताहर) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगांव आयोजित ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त गिरणा परिसरातील सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,सहकार शेती,प्रशासन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गिरणा परिसर नवरत्न पुरस्कार२०२०-२१ सोहळा व रक्तदान शिबीर संपन्न झाले.

या.सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा बाजार समितीचे सभापती सतिश शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोऱ्याचे जेष्ठ पत्रकार तथा अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ सुर्यवंशी,पाचोरा नगरसेविका सुचेता वाघ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष अनिल देशमुख,इंडियान्युज चँनलचे रिपोर्टर नरेंद्र कदम,अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनार,पत्रकार ललित खरे,प्रमोद ललवाणी,डॉ प्रमोद पाटील(भडगांव),हर्षल पाटील(कनाशी),माजी पं स.सदस्य अशोक सोनवणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुचित्रा आकडे,कजगांव आरोग्य केंंद्राचे वेदकिय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर याची प्रतिमा पूजनाने झाली.यानंतर महिला बचत गटाच्या सुनिता पाटील यांनी ईशस्तवन,स्वागत गीत सादर केले.यानंतर वरील सर्व मान्यवरांच्या अ.भा.ग्रा.पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात  रवींद्र पाटील(गुढे) यांनी कार्यक्रमाचा उद्देश व पत्रकारांची भुमिका व अनुभव सांगितला. यानंतर गिरणा परिसरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या ४०पुरस्कारार्थी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मनोगतात अनिल देशमुख,नरेंद्र कदम,भगवान सोनार,लक्ष्मण सुर्यवंशी,हर्षल पाटील, संजय सोनार,सतिश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून महत्वाची भूमिका बजावतो म्हणून तो समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे.

पत्रकारिता  समाजाला,न्याय,हक्क मिळवून देण्याचे जागृत व्यासपीठ असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या घटकांचा व रक्तदान शिबिर आयोजित बाबत कौतुक करण्यात आले.कार्यक्रमासाठी अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार आत्माराम पाटील, जिल्हाउपाध्यक्ष संजय कोतकर,तालुकाध्यक्ष नितीन सोनार, , पदाधिकारी अजय कोतकर,विलास पाटील,अमित देशमुख, सुनील भोसले,कैलास महाजन, निलेश पाटील, संजय महाजन,मनिष सोनवणे डॉ.बी.बी.भोसले,आनंदा महाजन,आदी पदाधिकारी यांनी व प्रा.आ.केद्राचे सर्व कर्मचारी,सुरभी ब्लँड बँक चाळीसगावचे डॉ. भदाणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.किरण पाटील(बँक सखी) प्रा.शिक्षक प्रविण पाटील यांनी केले तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष भानुदास महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.