अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी सुनील करंदीकर 

0
अमळनेर (प्रतिनिधी)-
 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची बैठक नुकतीच अमळनेरात उत्साहात  झाली. त्यात तालुका अध्यक्ष म्हणून सुनील करंदीकर, कार्याध्यक्ष प्रा.विजय गाढे व उपाध्यक्ष विजय पाटील, कुंदन पाटील व प्रा. विजय खैरनार यांची निवड करण्यात आली आहे.
   या प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान सोनार तसेच महिला जिल्हाध्यक्षा प्रा. जयश्री साळुंखे, जिल्हा कार्यध्यक्ष श्याम संदानशिव व जिल्हा खजिनदार किरण चव्हाण आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना भगवान सोनार म्हणाले कि, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्याने कितीही संघर्ष झाला तरी सत्याची कास सोडू नये. यानंतर प्रा. विजय गाढे, मिलिंद निकम, किरण चव्हाण, सुनील करंदीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर सचिवपदी संजय मरसाळे, सहसचिवपदी अजय भामरे,खजिनदार गणेश चव्हाण, प्रसिद्धिप्रमुख पदी सुरेश कांबळे, कमलेश वानखेडे, विधी सल्लागार अ‍ॅड. सलीम खान, अ‍ॅड.प्रशांत संदानशिव, संघटकपदी संदीप सैदाने, प्रवीण बेसानें तर सदस्यपदी सत्तर खान, डॉ आधार बोरसे, संजय सुतार, संजय पाटील मिलिंद निकम, शिवाजी पारधी यांची निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.