अहवाल उशिरा येत असल्याने आ.गिरीष महाजनांनी व्यक्त केली नाराजी!

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी संशयितांचे स्वब घेऊन त्यांचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. “कोरोना’ची लक्षणे असलेला रुग्ण तपासणीसाठी आल्यास रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे माजी मंत्री, आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने पाच जणांचा बळी गेला आहे.

कोरोना ‘लॅब’ लवकरात लवकर सुरू करा ; गिरीश महाजन
आ. गिरीश महाजन यांनी सध्या असलेल्या रुग्णांची स्थिती आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची महापालिका आयुक्तांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात “कोरोना’चा प्रभाव वाढत असताना संशयित रुग्णांचे अहवाल पाच -पाच दिवस उशिरा येत आहे. तसेच संशयित रुग्णांची तपासणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना देत जळगावात कोरोना “स्वब’ तपासणी लॅब लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली असून, याबाबत पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन व महापौरांची छ.शाहू महाराज रुग्णालयाला भेट
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री आमदार, गिरीश महाजन व महापौर भारती सोनवणे यांनी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, नगरसेवक कैलास सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, डॉ. राम रावलानी उपस्थित होते.

‘हॉकर्स’ला बसण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था
दरम्यान, महापौर भारती सोनवणे यांनी महापालिका प्रशासनाकडून “हॉकर्स’ला बसण्यासाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच आमदारांकडून मिळालेल्या निधीतून मनपा रुग्णालय अत्याधुनिक साहित्यांनी सुसज्ज करण्यात येणार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी रस्त्यावर, बाजारात गर्दी करू नये, “फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन व्हावे, यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात कोरोना लॅबचे काम संथपणे सुरू; पाठपुरावा करणार : महाजन
जिल्ह्यात कोरोना स्वब तपासणी लॅब सुरू करण्यास मंजुरी मिळाली असली तरी त्याचे काम संथपणे सुरू आहे. जळगावसह प्रत्येक जिल्ह्यात लॅब सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविणार असून स्वतः त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.