अवैध सावकारी प्रकरणी दिपीनकुमार सरोदे यांना जिल्हा निबंधकांनी बजावली नोटीस, 17 मार्चला सुनावणी

0

खामगाव (प्रतिनिधी) स्थानिक सिव्हील लाईन मधील रहिवाशी दिपीनकुमार सरोदे यांच्याकडे सावकारी परवाना नसताना सुध्दा नगदी व व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करुन अवैध सावकारी करीत आहे, सदर तक्रारीचे गांभीर्य पाहता जिल्हा निबंधक, सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांनी सरोदे यांना नोटीस बजावली असून 17 मार्च रोजी सुनावणीसाठी कार्यालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावली आहे, अन्यथा एकतर्फी निर्णय घेउन कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक कुलस्वामिनी फर्मचे भागीदार रमेश गोरशेटे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये सावकारी परवाना नसताना नगदी व व्याजाने पैसे देणार सरोदे यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. त्यांनी तक्रारीत असेही म्हटले आहे की, मी दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून  फर्मचे भागीदार मनोज अग्रवाल व निलेश इंगळे रा. खामगाव यांच्याविरुध्द 17 डिसेंबर 2020 रोजी खामगाव शहर पोलिस स्टेशनला अप.नं. 613/20 भादंविच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा बुलडाणा करीत आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.

सदर प्रकरणात दिपिनकुमार सरोदे यांनी आमच्या भागीदारी फर्ममध्ये नगदी 50 लाख रुपये व्याजाने दिले असून याबाबतचा जबाब  त्यांनी पोलिसांना दिलेला आहे. वास्तविक पाहता सरोदे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा सावकारी परवाना नसताना त्यांनी पैसे व्याजाने दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रमेशगोरशेटे यांनी केली असून सदर तक्रारीसोबत न्यायालयात दाखल केलेले शपथपत्र, नोटरी केलेला आपसी करारनामासह इतर महत्वपूर्ण कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हानिबंधक सावकारी तथा जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांनी सरोदे यांना उपरोक्त आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. तर या तक्रारीची प्रत रमेश गोरशेटेयांनी आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा यांना सुध्दा दिल्याचे समजते. आहे.

बोलविता धनी वेगळाच रमेश गोरशेटे फसवणूक प्रकरण शहरात चर्चेचा विषय असून यामध्ये आरोपिंना पाठीशी घालणारा फार मोठा भूमाफिया आहे, मा़त्र तो प्रकरणातून नामानिराळा आहे. आर्थिक गुन्हे शाखात्याच्यापर्यंत पोहचल्यास एक ना अनेक भानगडी समोर  येतील, एव्हढेच नव्हेतर तलाठी राजेश चोपडे भूखंड घोटाळा प्रकरणाची उकल होण्यास मदत होईल असे सुज्ञ नागरिक बोलत आहेत फक्त पोलिसांनी या दिशेने तपास करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.