अवैध वाळू वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे ?

1

लोकशाही (अग्रलेख)

सध्या जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक हा एक फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गिरणा नदी पात्रातील या ठिकाणचे वाळू लिलाव झालेले नाहीत तेथील नदी पात्रातील वाळू रात्रीच्या वेळी उपसा करून त्यांची अवैध मार्गाने विक्री करून अव्वाच्या सव्वा पैसे कमावले जातात. अवैध पैशाच्या माध्यमातून वाळू माफिये गब्बर झाले आहेत. काळ्याा पैशाच्या जोरावर ते कायदा हातात घेतात. वाळू संबंधात नियंत्रण ठेवणार्याा महसूल यंत्रणेला ते जणू किस झाड की पत्ती समजतात. अवैध वाहतूकवर नियंत्रण ठेवणार्याा आर.टी.ओ. अथवापोलिस यंत्रणेलाही ते घाबरत नाही. रात्रीच्या वेळी नदी पात्रातून सर्रास वाळू उपसा करून त्यांची रात्रीच्याच वेळी वहातूक केली जाते. नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असतांना त्यांचेवर कारवाई केल्याच्या काहीशा बातम्या अधून – मधून येतात. परंतु त्यांचेवर होणार्याा कारवाईचे पुढे काय होते ते मात्र कळत नाही. अनेक वेळा वाळूचे ट्रॅक्टर, डंपर नदीपात्रात पकडून ते जप्त करून तहसील अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठेवले जातात. परंतु जप्त करून ठेवलेले ट्रॅक्टर तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातून गायब झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. जप्त केलेले ट्रॅक्टर गायब होण्यामागचे रहस्य काय ? त्याला कोणाचा तरी आशिर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही. कारण जप्त केलेल्या ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा काढली पाहिजे. जेणेकरून त्या टायरमध्ये हवा भरल्याशिवाय तेथून हलवणे शक्य होणार नाही. ट्रॅक्टरची चावीसुद्धा जप्त केली जाते तथापी डुप्लीकेट चावीने ट्रॅक्टर चालू करता येते म्हणून टायरमधील हवा काढणे हा त्यावर पर्याय आहे. तेव्हा तहसील व जिल्हाधिकारी आवारात जप्त करून ठेवलेले ट्रॅक्टर संबंधित कोणाच्यातरी आशिर्वादाशिवाय गायब होणे शक्य नाही म्हणून वाळू माफियांशी संबंधित यंत्रणेतील हात मिळवणी असल्याशिवाय हे शक्यच नाही.

सोमवार दिनांक 6 मे रोजी जळगाव तालुक्यातील किनोद  येथील तापी नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करणारे 11 ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडले. त्यावेळी ट्रॅक्टरचालक तेथून पसार झाले. किनोदच्या ग्रामस्थांनी महसूल व खाते व पोलिसांना कळविले पोलिस तेथे पोहोचले आणि ते 11 ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. किनोदच्या ग्रामस्थांनी मोठे धाडस केलेले आहे. कारण वाळू माफियांचे हा फार दूरवर पोहोचलेले असतात. तेथून जवळच असलेल्या सुटकार येथील नदी पात्रातील वाळूचा लिलाव झालेला आहे. परंतु किनोद येथील वाळू पात्राचा लिलाव झाला नसतांना एकच वेळी 11 ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जाते हे कुणाच्या तरी आशिर्वादाशिवाय शक्य आहे काय? किनोद ग्रामस्थांनी 11 ट्रॅक्टर पकडून दिल्यानंतर त्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. बर्यााच वेळा थातूर मातूर कारवाई करून काही रूपये दंड करून ट्रॅक्टर सोडले जातात. त्यानंतर अवैध वाळू करण्यासाठी पुन्हा हे ट्रॅक्टर सज होतात. अवैध वाळू उपशामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होतेय. बेदरकारपणे अवैध वहातूक करणार्याा ट्रॅक्टर आणि डंपरमुळे वारंवार अपघात होतात. ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडविले, कार ट्रॅक्टर अपघातात दोन ठार, दोन जखमी अशा  प्रकारच्या घटना वारंवार होतात. वाळू माफिचे एकतर सार्वजनिक संपत्ती हडप करतात. त्यातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा कमावतात. त्याचबरोबर बेदकार वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले जातात. याचा जीव जातो त्याची किंमत पैशाने मोजता येणार नाही. तो जीव त्यांना मिळणार नाही. म्हणून अवैध वहातुकीवर नियंत्रण ठेवणार्याा यंत्रणेने ठरवले तर ती अवैध वहातूक कायमस्वरूपी बंद होऊ शकते. सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास किनोद ग्रामस्थ नदीपात्रात जाऊन ट्रॅक्टर पकडतात याचा अर्थ अवैध वाळू उपसा करणार्याा वाळू माफियांची हिंमत किती वाढली आहे हेच दिसून येते. भरदिवसा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणे हे कोणाच्यातरी आशिर्वादाशिवाय शक्य नाही.

चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणा येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करत असतांना काही डंपर हिंगोणा ग्रामस्थांनी पकडून महसूल व पोलिस खात्याच्या सुपूर्द केले. त्यानंतर अवैध उपसा करणार्याा त्या डंपरवर पोलिस खात्यामार्फत कसलीच कारवाई झाली नाही. अखेर अवैध वाळू उपसा करणार्याावर कारवाई होणेसाठी हिंगोणा येथील सरपंचासह ग्रामस्थ नदीपात्रातच बेमुदत उपोषणाला बसले. तीन चार दिवस उलटले तरी उपोषरार्थींच्या मागण्याची दखल स्थानिक महसूल पोलिस यंत्रणेने घेतलेनाही. परंतु त्याचे पडसाद मंत्रालयात उमटले. मंत्रालयातून आदेश आल्यानंतर त्यांचेवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुटले. याचा अर्थ संबंधित यंत्रणेने जणू गेंड्याची कातडीच पांघरून बसलेली आहे. पाचोरा, भडगाव, कजगाव, चाळीसगाव या मार्गावर रात्री होणार्याा बेदरकार अवैध वाळू वाहतुकीमुळे त्या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज अपघाताच्या घटना होतात. तरी सुद्धा अवैध वाहतुकीला संबंधित यंत्रणेकडून आळा घातला जात नाही. हे कशाचे द्योतक म्हणावे? त्यामुळे अवैध वाळू वाहतुकी संबंधात कितीही ओरड होत असली तरी त्याची दखल घेणार कोण ? हा खरा प्रश्न असून तो अनुत्तरीत आहे.

 

1 Comment
  1. Ajay patil says

    This is right things to right Mr Manoj in news paper

Leave A Reply

Your email address will not be published.