अवैध बायोडिझेलचा साठा जप्त; ३ जणांना अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील एमआयडीसीमध्ये अवैधपणे बायोडिझेलचा साठा करुन त्याची चोरटी विक्रि करणार्‍या तिघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून स्थानिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे.

या प्रकरणी दानिश शेख अन्वर शेख (वय २३), शोएब खान, मंजुर खान (वय ३३) रा दोघे रा. मास्टर कॉलनी,जळगाव व अली दय्यान अली अब्बास (वय ४३ रा. बिलाल चौक तांबापुरा)या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन वाहने व ६८ हजार ८०० रुपयांचे बायोडिझेल असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसीत एम.एच. १९ एस. ५७१५ या वाहनाव्दारे बायोडिझेलची चोरटी विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरिक्षक अमोल देवरे, सुनील दामोदरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पंकज शिंदे, हेमंत पाटील, विजय चौधरी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक अमोले मोरे,पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे, पोलीस नाईक मुदस्सर काझी, पोलीस नाईक योगेश बारी यांच्या पथकाला सोबत कारवाई केली.

एमआयडीसीतील फातेमार नगर परिसरात एका कंपनीजवळ मोकळ्या जागेत वाहन उभे करुन तीन जण बायोडिझेलची चोरटी विक्री करत असतांना मिळून आले. त्यांच्याकडून ६८ हजार रुपये किंमतीचे बायोडिझेल तसेच दोन वाहने असा १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येवून याप्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.