अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अवैध दारू साठा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार सैंधवा कडून शिरपूरकडे मॅक्स कंपनीची गाडी नंबर  MH 22 M 481 यामध्ये दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता शिरपूर तालुका पोलिसांची एक टीम दि. 15 नोव्हेंबर रोजी रात्री 2.15 मिनिटांनी पलासनेर गावाच्या शिवारात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चारणपाड्या जवळील गतिरोधक जवळ मॅक्स कंपनीच्या गाडीला थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा व्हिस्की, लेमाड व्हिस्की बियरचे खोके मिळून आले.

सदर व्यक्तीचे नाव सनी संजय कलाल रा. वरवाडे शिवार शिरपूर हा व्यक्ती बियरचे टिन, लेमाड व्हिस्की, गोवा व्हिस्कीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध  वाहतूक करतांना ताब्यात घेवून त्याच्याकडून 1,38000/ रू किंमतीचे लेमोंड  कंपनीचे स्ट्रांग 50 बियरचे खोके, 62,400/ रू किंमतीचे रॉयल शिलेट व्हिस्कीचे 10 बॉक्स,  25,200/ रू किंमतीचे गोवा व्हिस्कीचे 4 बॉक्स, तसेच  2,50,000/ रू. किमतीचे  महेंद्र मॅक्स कंपनीची गाडी नंबर MH22 M481असा एकूण 4,75,600/ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई  पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, सो. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार बच्छाव, सो. धुळे मा. पोलिस उपविभागीय अधिकारी माने शिरपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई खैरनार, असई नियात शेख, पोहेकॉ पवन गवळी, पॉकाँ मुकेश पावरा, पोना रोहिदास पावरा, पोकॉ सईद शेख यांच्या पथकाने केली असून पुढील तपास असई बाविस्कर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.