अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बोदवड शहरातील १४ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीची परिसरात शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही.

याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी बोदवड पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.