अरे कोरोना आता तरी बस करोना …भुकेल्या आईची आर्त हाक

0

पारोळा (प्रतिनिधी) : आज कोरोनाने जवळपास सारे जग व्यापले आहे.  त्याने येथेच्छ असा उच्छाद मांडलेला आहे. यातून ग्रामीण भाग ही सुद्धा नाही सुटला अश्याच पारोळा तालुक्यातील लोणी बु।। येथील आक्काबाई ईश्वर सोनवणे ह्या हातावर पोट असणाऱ्या महिलेने भुकेल्या पोटी आर्त हाक दिली आहे. कोरोना आता तरी बस करोना अशी  अवस्था रोजंदारी नसल्यामुळे अतिशय बिकट झाली आहे. एखाद्याच्या मागे दृष्टचक्र लागले तर ते आयुष्यभर पुरते असा काहीसा अनुभव या महिला मजुरास येत आहे. सन 2012 मध्ये पतीचा मृत्यु झाला तेव्हा पासून आपल्या 3 मुलांना घेऊन गावोगावी मजुरी करून पोट भरणारी ही बाई आज पुरती लाचार अन बेजार झाली आहे. 3 मुले त्यात एक मुकबधिर घरात पाणी सोडले तर खायला काहीच नाही पोरांना खायला काय द्यावे असा गहन प्रश्न एक माता म्हणून या बाईला पडत आहे पूर्वी दररोज हाताला काम होत पण आता तर  ते ही नाही. सर्व ठिकाणी जमाव बंदी , संचारबंदी लागू केलेली आहे. म्हणून कुठे जाणं सुद्धा शक्य नाही, गेल्या काही दिवसांपासून तर चक्क कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

आपण कमवू तरच खाऊ अशा सर्वसामान्यांसमोर सद्यस्थितीला भूक ही सर्वात मोठी समस्या उभी आहे. भूकेसाठी अन्नाची , अन्नासाठी पैशांची आणि पैशांसाठी रोजगाराची आवश्यकता असते. या बेरोजगारीने भूक हा आजार जन्मास घातला की काय असं वाटायला लागलं या भुकेमुळे कोणाचे बळी तर जाणार नाही ना  . या साठी सरकारसह अनेक सामाजिक संघटना पुढे सरसवल्या आहेत . मात्र ग्रामीण भागात पाहिजी तशी मदत अदयाप पर्यंत पोहचलेली नसल्या मुळे रोजदारी वर काम करणाऱ्याचे हाल होत असल्याचे दिसत आहेत . याच गावात अजून चार ते पाच कुटूंबं आहेत . ते हात मजुरी करुन पोट भरतात परंतु आज हाताला काम नसल्या मुळे ह्या कुटूंब्यावर उपास मारीची वेळ आली आहे . अनेक दाते मदतीसाठी पुढे आलेले आहेत . हया कुटूंबा पर्यंत मदत कशी पोहचेल या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.