शेंदुर्णीत रक्तदान शिबिरात १२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

शेंदूर्णी (प्रतिनिधी) : सद्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून राज्यात लॉक डाउन घोषित करण्यात आला आहे. अशाही स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे व महाराष्ट्र शासनाच्या आवाहना प्रमाणे सध्या कोरोना आजारामुळे जगभर महामारीचे सावट आहे. सर्व भारत लॉकडाउन असताना महाराष्ट्र राज्यात रक्ताचा पुरवठा संपत आला आहे. केवळ एक आठवडा पुरेल इतकाच रक्तपुरवठा शिल्लक आहे अशी माहिती दिली होती व सोशियल डिस्टन्स ठेऊन सद्याच्या परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमाला अनुसरून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत शेंदूर्णी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या  संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले ,जनतेनेही ,जात , धर्म, पक्ष,हा कोणताही भेदभाव न ठेवता  मानवता हाच एकमेव उद्देश समोर ठेवून कोरोना ग्रस्त रुग्णांना मदत व राष्ट्रीय कार्य म्हणून  आज १ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ९ पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत  १२३ रुग्णांनी रक्तदान केले शिबिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आले.

या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी आज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशियल  डिस्टन्सचे सर्व नियम पाळून स्वच्छ साबणाने हात धुवून सॅनिटायझरचा वापर करून रक्तदान केले सुरक्षित अंतर ठेवून लोक रांगेत होते प्रत्येकाने मास्क लावला होता.

या प्रसंगी आयोजकांनी मास्क वाटप केले या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी  ईश्वर कातकडे, शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी,जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, युवक कार्याध्यक्ष सागर कुमावत,रवी गुजर,फारूक खाटीक, अमरीश गरुड,श्रीराम काटे,किशोर भावसार, प्रसन्न फासे,स्नेहदीप गरुड यांचेसह १२३ रक्त दात्यांनी या शिबिरात रक्तदान केले कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान धन्वंतरी प्रतिमेचे पूजा सागरमल जैन, सुधाकर बारी, डॉ किरण सुर्यवंशी, शांताराम गुजर ,विलास पाटील,प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉ. राहुल निकम, डॉ उमेश कोल्हे ,शिवसेनेचे संजय सूर्यवंशी,बारकू जाधव, प्राचार्य डॉ वासुदेव पाटील, गरुड कनिष्ठ महा विद्यालय प्राचार्य एस.पी.उदार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ,उप  प्राचार्य डॉ संजय भोळे , डॉ श्याम साळुंखे आणि विद्यार्थी  विद्यार्थिनी  व कर्मचारी यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना व काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी शासकीय रक्तपेढी तर्फे, डॉ  संदीप साबळे,डॉ राहुल निकम,श्री निलेश पवार, श्री लक्ष्मीकांत त्रिपाठी,भरत महाले, मनीषा पाटील,प्रभाकर पाटील,बापू नेरे यांनी रक्तसंकलन कार्य केले या कामी शेंदूर्णी प्राथमिक रुग्णालयात आरोग्य कर्मचारी सुरळकर, किशोर कोळी,गजानन बारी,प्रा.डॉ अजिनाथ जिवरग ,प्रा. प्रमोद सोनवणे  ,प्रा.डॉ वसंत पतंगेप्रा.डॉ दिनेश पाटील,प्रा महेश पाटील, पंकज जैन,संजय सपकाळ, निलेश महाले,यांचे सहकार्य लाभले, संदीप जावळे,अलीम तडवी ,अजय निकम,योगेश गुजर ,गजानन धनगर, आनंदा धनगर, प्रवीण गरुड ,धीरज जैन यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले परिश्रम घेतले. या प्रसंगी सतीश बाविस्कर, हितेंद्र गरुड, प्रा अमर जावळे, डॉ रोहिदास गवारे, उपप्राचार्य राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.