पारोळा शहरात वाहनांना बंदी !

0

पारोळा (प्रतिनिधी) : सध्या देशात कोरोनाचे रूग्ण वाढत चालले असून त्यात महाराष्ट्रमध्ये ही संख्या जास्त आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात खबरदारीचे विविध प्रकारे उपाय करण्यात येत आहेत. जसे की राज्य बंदी, जिल्हा बंदी, असे अनेक उपाय करून कोरोना वायरसला अटकाव करण्यात साठी सर्वच स्थारावरून उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पारोळा नगरपालिके च्या वतीने पारोळा शहरात बाहेरून व शहरातील ही वाहानाना बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून विनाकारण अनावश्यक फिरणाऱ्या ना लगाम बसेल व प्रशासन वरिल ताण कमी होईल.

त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रमुख सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स लावून व काही ठिकाणी बांबू लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत, केवळ पायी येण्या जाण्यासाठी लागणारा रस्ता लोकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे, तसेच बाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवांची प्रत्येक वाहानास तपासणी करून च गावात प्रवेश दिला जात आहे, तसेच गावातील नागरिकांना ही काही काम असल्यास त्यांना नगरपालिकेच्या वतीने पासेस देण्यात आल्या आहेत, त्यामुळे विनाकारण अनावश्यक कारणाने वाहने घेऊन रस्त्यावर किंवा गावात फिरू नये अन्यथा कारवाई करून वाहन जप्त करण्यात येईल असे आवाहन प्रशासन च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.