अमळनेर पं.स.पुन्हा भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी रेखाबाई पाटील

0

अमळनेर : अमळनेर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक पार पडली . यात अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी रेखाबाई नाटेश्वर पाटील तर उपसभापती पदी भिकेश पावभा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. हे दोन्ही उमेदवार हे भाजपचे असल्याने. भाजपची एकहाती सत्ता बसली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरम्यान या निवडीमुळे नवनिर्वाचित सभापती रेखाबाई पाटील व उपसभापती भिकेश पाटिल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला।.

Leave A Reply

Your email address will not be published.