बोदवड पं.स.सभापतीपदी किशोर गायकवाड तर उपसभापतीपदी प्रतिभा टिकारे

0

बोदवड – येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज २ जानेवारी,गुरुवार रोजी बोदवड तहसिल कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. त्यात सभापतीपदी किशोर भिमराव गायकवाड तर उपसभापतीपदी प्रतिभा निलेश टिकारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार रविंद्र जोगी,तर त्यांना नायब तहसिलदार दिपक कुसकर आणि लिपिक श्रध्दा चौरे यांनी सहकार्य केले.

यावेळी सभापती पदासाठी एक तर उपसभापतीपदासाठी एक असे प्रत्येकी दोनचं नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.त्यात सभापतीपदी किशोर भिमराव गायकवाड तर उपसभापतीपदी प्रतिभा निलेश टिकारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यात सभापती किशोर गायकवाड यांच्या निवडीला पंचायत समिती सदस्य गणेश पाटील हे सुचक ठरले तर उपसभापती प्रतिभा निलेश टिकारे यांना सभापती किशोर गायकवाड हे सुचक ठरले.ही निवड प्रक्रिया दुपारी ३ वाजता पार पडली.आगामी अडीच वर्षांसाठी ही निवड असून सभापती हे पद अनुसुचीत जातीसाठी राखीव असल्याने भाजपचे व साळशिंगी गणातून प्रथमचं राजकारणात प्रवेश केलेल्या व प्रथमचं निवडून आलेल्या किशोर भिमराव गायकवाड यांची वर्णी लागली असून ते सभापतीपदाचा तर उपसभापती म्हणुन मनुर गणातून निवडून आलेल्या सौ.प्रतिभा निलेश टिकारे यांनी आज पदभार स्वीकारला.

गेल्या अडीच वर्षांपासून येथे सभापतीपदी गणेश सिताराम पाटील व उपसभापती म्हणुन सौ.दिपाली जीवन राणे होत्या.त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत प्रकिया पार पडली व सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनुसूचित जात प्रवर्गातून व नव्याने स्थापन झालेल्या साळशिंगी गणातून निवडून आलेले एकमेव किशोर गायकवाड यांची सभापतीपदी वर्णी लागली आहे.

बोदवड पंचायत समितीच्या चारही गणातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे असल्याने येथील पंचायत समितीवर भाजपाची एकहाती सत्ता आहे.

गेली अडीच वर्ष सभापती पद शेलवड गणाचे गणेश पाटील यांनी तर उपसभापतीपद नाडगाव गणाच्या सौ.दिपाली जीवन राणे यांनी पद भुषविले असल्याने पुढील अडीच वर्ष उपसभापती म्हणुन सौ.प्रतिभा निलेश टिकारे यांची वर्णी लागली असून आज सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.