अमळनेर नगरपरिषद राबवणार “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषद तर्फे कोविड १९ च्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. शासन निर्णय ११ सप्टेंबर, २०२० अन्वये दिनांक १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निच्छीत करण्यात आले असून, सदर मोहिमेद्वारे अमळनेर शहरातील संपूर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी एकूण ३७ आरोग्य पथकांद्वारे केली जाणार आहे.त्या एका पथकात दोन आरोग्य कर्मचारी समाविष्ट असून, सदर पथक दररोज नियमित ५० घरातील लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण करणार आहेत.त्यात मुख्यते ५० वर्षावरील नागरिक, लहान बालके व गरोदर माता यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.या तपासणीत नागरिकांचे तापमान,ऑक्सिजन लेव्हल तसेच इतर आजार जसे मधुमेह, किडनी चे विकार,हृदरोग, यासारखे दुर्धर आजार असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, त्याबाबत ज्यांना काही सौम्य प्रमाणात लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ वैद्यकिय सुविधा उपलब्द्ध करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

योजनेचा शुभारंभ अमळनेर नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यात करून करण्यात आला. सोबत माजी आमदार कृषिभूषण साहबेराव पाटील,नगरसेवक मनोज पाटील,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,डॉ.विलास महाजन,डॉ.शेलकर,महेश पाटील,रवि पाटील,प्रीतपालसिंग बग्गा,संजय चौधरी,निलेश साळुंखे व आरोग्य पथक कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.