जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४० हजार पार ; आज ८७८ नवे रूग्ण आढळले

0

 जळगाव । जिल्ह्यात आज दिवसभरात ८७८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरासह, चोपडा, अमळनेर तालुक्यात पुन्हा रूग्ण संख्येत वाढत झाल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या २४ तासात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ४० हजार १६५ इतकी झालेली आहे.

असे आढळले रूग्ण
जळगाव शहर-१५०; जळगाव ग्रामीण-४९; भुसावळ-५१; अमळनेर-१२६; चोपडा-१२४; पाचोरा-३७; भडगाव-३५; धरणगाव-४८; यावल-१९; एरंडोल-३४, जामनेर-५६; रावेर-२२; पारोळा-३४; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-१९, बोदवड-४० व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ९ असे एकुण ८७८ रूग्ण आढळून आले आहेत.

दिलासादायक बाब अशी की,आज ७०७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २९ हजार १६८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज १८ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १००८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ९८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.