अमळनेरात महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी सुरू

0

नियोजनासाठी बाजार समितीत झाली बैठक, उदय वाघ यांनी केल्या सूचना

अमळनेर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दि 8 ऑगस्ट रोजी अमळनेरात दाखल होणार असल्याने अमळनेर भाजपाच्या वतीने यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात नियोजनासाठी अमळनेर बाजार समितीत माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडून कार्यकर्त्याना जवाबदारीचे वाटप करण्यात आले.

सदर बैठकीत मार्केट सभापती प्रफुल्ल पवार,भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहर अध्यक्ष शितल देशमुख,ता.सरचिटणीस जिजाब पाटील, हिरालाल पाटील, शहर सरचिटणीस उमेश वाल्हे, शरद सोनवणे, जुलाल पाटील यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नियोजनासाठी समित्या स्थापन करून कार्यकर्त्यानी दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात अशी अपेक्षा उदय वाघ यांनी व्यक्त करत सदर यात्रेसंदर्भात मार्गदर्शन केले.या यात्रेबाबत जनतेत प्रचंड उत्सुकता असून ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दि 8 रोजी अमळनेर तालुक्यात दाखल होऊन ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत होणार आहे,सदर यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांचेसह इतर मंत्री महोदय तसेच जेष्ठ नेत्यांचे आगमन अमळनेरात होणार असून कार्यकर्त्यानी सज्ज राहावे असे आवाहन वाघ यांनी केले.तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील व शहराध्यक्ष देशमुख यानीही यावेळी मनोगत व्यक्त करून यात्रेच्या स्वागताचे उत्कृष्ठ नियोजन करणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.