अमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा

0

अमरावती (प्रतिनिधी) :  सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रीडा विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था तसेच क्रीडा संस्थांतर्फे ठीक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा क्रिडा कार्यालयातर्फे ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दीपप्रज्वलन केले .या कार्यक्रमात प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाबरोबरच प्रश्नमंजुषा ही घेण्यात आली. सुमारे चारशे नागरिकांनी त्यात सहभाग घेतला होता. यावेळी योग प्रसारक राजू भाऊ देशमुख, जय मालाताई देशमुख यांनी मार्गदर्शन केले .

जिल्हा आयुष विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मनीषा  सूर्यवंशी यांनी योगा बाबत मार्गदर्शन केले. कोविड केअर सेंटर येथेही योगा अभ्यासाद्वारे रुग्णांचे मनोबल वाढविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी ,योगशिक्षक समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व सेवक यांच्या माध्यमातून योगा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. योगाच्या आधारे शरीर व मनाचे संतुलन साधले जाते रोगप्रतिकारक शक्ती व मनाची सजगता व एकाग्रता वाढते. व्यक्तिमत्व आनंदी होऊन नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. शरीराची ऊर्जा वाढते व ताणतणावाचे निरसन होते. असे डॉक्टर सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.