अभाविप अमळनेर नूतन शहर कार्यकारिणी जाहीर

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर शहर कार्यकारिणी घोषणा आज करण्यात आली. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याचे 75 वर्ष तसेच अभाविप परिचय करून देताना विद्यार्थ्यांसमोर अभाविपचा 74 वर्षाचा ज्वलंत इतिहास विद्यार्थ्यांसमोर ठेवला. यावेळी मंचावर शहर मंत्री केशव पाटील, निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी काम पाहिले.

मागील शैक्षणिक वर्षातील अभाविप अमळनेर शहराच्या वतीने केलेल्या कार्याचा उजाळा शहरमंत्री केशव पाटील  यांनी दिला. तसेच त्यानंतर इच्छेश काबरा  यांनी मागील शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी विसर्जित केली आणि नवीन शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२  कार्यकारिणी जाहीर केली. यात  तालुका संयोजक केशव पाटील, शहरमंत्री अमोल पाटील, शहर सहमंत्री सुप्रीम पाटील, शहर सहमंत्री चैत्राली बाविस्कर, शहर सहमंत्री हर्षवर्धन बडगुजर,  कार्यालय मंत्री अश्विन पाटील, कार्यालय सह मंत्री रितल राजपूत, प्रसिद्धी प्रमुख पवन पाटील, अभ्यासमंडळ समितीमध्ये अभय काळे, गणेश मिस्त्री, प्रेम पाटील, SFD प्रमुख विशाल जाधव, SFS प्रमुख सुप्रिया बोरसे, कलामंच प्रमुख मधूर पाटील, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख अक्षद शाहा, वरिष्ठ महाविद्यालय प्रमुख चेतन पाटील, सदस्य विशाल पाटील, कुणाल कोळी, हर्षद पाटील, सुजल शर्मा, देवयानी भावसार, वैभव पाटील, क्रांती ठाकरे, मयूर पाटील आदी अशा प्रकारे अभाविप अमळनेर शहर कार्यकारिणी आहे.

यानंतर प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी स्वातंत्र्याचे 75 वे वर्षात युवकांचे योगदान याविषयी आपले विचार मांडले व सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले व आगामी काळात शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी अभाविप सातत्याने प्रयत्न करेल व प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

कार्यकारणी घोषणेनंतर प्रताप महाविद्यालयाच्या बाहेर अभाविप अमळनेर शाखेचे फलकाचे अनावरण प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिनेट सदस्य दिनेश नाईक, नरेंद्र निकुंभ, मनोहर सोनवणे, विवेक सुर्यवंशी, प्रगती काळे, निलेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.