अपंग बांधवांना मोफत फार्म वाटप करून केला वाढदिवस साजरा

0

बोदवड – येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे तालुकाध्यक्ष धनराज गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अपंग बांधवांना स्व:खर्चातून विविध योजनांचे फार्म वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत व यांच्या स्व:उत्पन्नातून राखीव असलेला निधी दिव्यांग बांधवांना मिळावा यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने दिव्यांग बांधवांना राखीव निधी मिळावा यासाठी विशेष मार्गदर्शक व मोफत फार्म वाटप करण्यात आले.

तालुक्यातील दिव्यांग बांधव शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहू नये तसेच अपंग बांधवांची धावपळ लक्षात घेता श्री.गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अतिरिक्त खर्च टाळून अपंग बांधवांना मोफत फार्म वाटप केले.

सदर फार्म वाटप करतेवेळी बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी,गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ,पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते हाजी सईद बागवान,भरत आप्पा पाटील,सचिन उगले,किशोर बडगुजर,प्रदीप बडगुजर,धनराज मिस्तरी विष्णू सपकाळ,निलेश मु-हेकर,सुधीर पाटील,राजेश बोदडे युवराज तायडे,राहुल मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.