चोपड्यात मंडळ अधिकारी राजेंद्र वाडे सह पंटर लाच स्वीकारताना अटक

0

दोन दिवसात लाचलुचपत विभागाची दुसरी कारवाई

चोपडा : बे कायदेशीर वाळू वाहतुक करण्यासाठी वाहतूकदारा कडून दरमहा ठरलेला हफ्ताची रक्कम आठ हजार रु स्वीकारताना  शहराचे मंडळ अधिकारी राजेंद्र वाडे व पंटर समाधान मराठे यांना दि ७ रोजी रात्री १२ च्या सुमारास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.दोन दिवसात चोपडा तहसील कार्यालयातील ही दुसरी घटना असून कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील वाळू वाहतूकदारावर वाळू वाहतुकी दरम्यान कारवाई न करण्याचा मोबदल्यात मंडळ अधिकारी राजेंद्र आधार वाडे((५३) रा आंबेडकर नगर ,चोपडा  यांनी दहा हजारांची मागणी केली होती परंतु तडजोडी अंती आठ हजार रुपये हफ्ता ठरविण्यात आला होता. सदर हप्त्याची रक्कम आठ हजार  मंडळ अधिकारी राजेंद्र वाडे यांचा पंटर समाधान रमेश मराठे(२४) रा पाटील गढी ,चोपडा हा तक्रारदाराकडून यावल रस्त्यावरील शहराच्या गावाबाहेरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दि ७ रोजी रात्री १२ च्या सुमारास स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.चोपडा याप्रकरणी वाळू वाहतुकदाराच्या तक्रारी वरून शहर पो स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ हजाराच्या लाच प्रकरणी

मंडळ अधिकारी राजेंद्र आधार वाडे व  पंटर समाधान रमेश मराठे यांना लाचलुचपत विभागाच्या पथकातील जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय निलेश लोधी, पी आय संजोग बच्छाव स फौ रवींद्र माळी, पोहेकॉ अशोक अहिरे,सुरेश पाटील,सुनील पाटील,पोना मनोज जोशी सुनील शिरसाठ  जनार्दन चौधरी,पोका प्रशांत ठाकूर,प्रवीण पाटील,नासिर देशमुख,महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांनी हा सापळा यशस्वी करून दोघा संशयितांना अटक केली. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक एस के बच्छाव करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.